कोकणातही काँग्रेस-राष्ट्रवादीला पडणार खिंडार,अर्धा डझन आमदार भाजपच्या वाटेवर

टीम महाराष्ट्र देशा- लोकसभा निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ केलेल्या भाजपची नजर आता आगामी विधानसभा निवडणुकीवर आहे. भाजपकडून स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी सुरु असून कॉंग्रेस-राष्ट्रवादीमधील अनेक नेत्यांना पक्षात घेतले जात आहेत. काल भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आणखी १६ आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक सांगितले असताना आता कोकणातील पाच ते सहा आमदारही भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केला आहे.

‘अनेक आमदारांना भाजपमध्ये यायचं आहे. पण पक्षात कोणाला घ्यायचं, कोणाला नाही घ्यायचं याचा निर्णय पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री घेणार आहेत. त्यामुळे लवकरच भाजपमध्ये आणखी मोठ्या प्रमाणात इनकमिंग होईल,’ असं म्हणत कोकणातही काँग्रेस-राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याचे संकेत भाजपच्या प्रसाद लाड यांनी दिले आहेत.

Loading...

दरम्यान, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आणखी १६ आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक असून, ते आमच्या संपर्कात आहेत.एवढेच नव्हे तर कॉंग्रेसचे अनेक दिग्गज नेतेही रांग लावून उभे आहेत, असा गौप्यस्फोट केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी येथे केला.

चिकलठाण्यात झालेल्या विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळाच्या कार्यक्रमात कॉंग्रेसच्या सरसाबाई वाघ यांच्यासह औरंगाबाद तालुक्यातील सरपंच,उपसरपंचासह काही कार्यकर्त्यांनी दानवे व बागडे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. या प्रवेशानंतर दानवे बोलत होते.पक्षात इनकमिंग होत असल्याने जुन्या कार्यकर्त्यांनी घाबरण्याची गरज नाही. कुणी आले तरी आपले काम सुरूच ठेवायचे असते. एकनाएक दिवस तुम्हाला नक्कीच न्याय मिळतो, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
इंदुरीकर महाराज तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका : रुपाली पाटील- ठोंबरे
जगात शिवसेनेएवढे 'नीच' राजकारण कोणीच करू शकत नाही
'आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचा दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन'
मी 'गमतीजमती' सुरु केल्या तर, तुमच्या मदतीलाही कोणी येणार नाही : अजित पवार
इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी : खासदार सुप्रिया सुळे
तृप्ती देसाईंवर अश्लील टीका करणाऱ्यांचा किशोरी शहाणेंनी  घेतला समाचार
इंदुरीकर महाराज तुम्ही कीर्तन सोडू नका,संयम ठेवा,अवघा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे : बानगुडे पाटील
आता 'यां'नीही केला CAA आणि NRC ला विरोध, शरद पवारांची घेतली भेट