fbpx

एमजीएम हेरिटेज रनमध्ये धावले 3 हजारांहून अधिक अबालवृद्ध

औरंगाबाद: महात्मा गांधी मिशनच्या 35 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 5 व्या हेरिटेज रनला औरंगाबाद शहर तसेच परिसरातील अबालवृद्धांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. विविध शाळा, महाविद्यालये, उद्योग संस्था आणि आस्थापना, पोलीस-सैनिक प्रशिक्षण केंद्रे, स्पोर्ट यलब आदींनी या उपक्रमात सहभागी होऊन हेरिटेज रनची संकल्पना यशस्वी केली.

गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने महात्मा गांधी मिशन शहरातील ऐतेहासिक तसेच सांस्कृतिक प्रतिकांच्या संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश देण्यासाठी हेरिटेज रनचे आयोजन करत आहे. यावर्षी हेरिटेज रनमध्ये सुमारे 3 हजारांहून अधिक धावकांनी सहभाग घेतला. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रवेश प्रिती भानुशाली यांच्या म्युझीक वॉर्मअप आणि डॉ. पुजा देशमुख यांच्या सुत्रसंचलनाने वाढवला धावकांचा उत्साहनि:शुल्क ठेवण्यात आला होता. तसेच सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. यशस्वी धावकांना संस्थेतर्फे 1 लाख 30 हजारांची भरघोस पारितोषिके देण्यात आली.