Share

5G Smartphone | ‘हे’ 5G स्मार्टफोन उपलब्ध आहेत कमीतकमी किमतीमध्ये

काल म्हणजेच 1 ऑक्टोबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशात 5G नेटवर्क लाँच करण्यात आले. 5G तंत्रज्ञान आल्यामुळे डिजिटल इंडिया मोहिमेला गती प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर आपला स्मार्टफोन 5G नेटवर्क सह बदलण्याची आता वेळ आली आहे. या 5G नेटवर्कसाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. कारण बाजारात 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत 5G नेटवर्क असलेले स्मार्टफोन उपलब्ध आहे. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल:

कमीत कमी किमतीचे 5G स्मार्टफोन

Oppo A74 5G

Oppo चा Oppo A74 5G हा स्मार्टफोन 5G तंत्रज्ञानासह सुसज्ज आहे. यामध्ये Qualcomm Snapdragon 480 5G प्रोसेसर आहे. या स्मार्टफोनचा डिस्प्ले फुल एचडी + रिझोल्युशन मध्ये आहे. त्याचबरोबर या फोनची स्क्रीन 6.49 इंच आहे. या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देखील आहे. ज्यामध्ये 48MP मेन रिअल कॅमेरा, 2MP डेप्थ आणि 2MP मॅक्रो कॅमेरा यांचा समावेश आहे. या फोनच्या बॅटरी बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 5000mAh बॅटरी आहे. या Oppo स्मार्टफोनची किंमत आहे 14,990 रुपये.

Samsung Galaxy M13

Samsung चा हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 700 प्रोसेसर तंत्रज्ञानासह बाजारात उपलब्ध आहे. या फोनचा डिस्प्ले फुल एचडी असून तो 6.5 इंच आहे. या स्मार्टफोन मध्ये ड्युअल कॅमेरा आहे. ज्यामध्ये 50MP मेन रिअल कॅमेरा 2MP दुसरा कॅमेरा आहे. याचबरोबर 5MP फ्रंट कॅमेरा आहे. या फोनच्या बॅटरी बद्दल सांगायचे झाले तर यात 5000mAh बॅटरी आहे. या स्मार्टफोनच्या 4GB मॉडेल ची किंमत 11,999 आहे तर 6GB मॉडेल ची किंमत 13,999 रुपये आहे.

Realme Narzo 50 5G

Realme Narzo 50 5G हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 810 5G प्रोसेसर सह उपलब्ध आहे. या फोनच्या स्टोरेज बद्दल सांगायचे झाले तर यामध्ये 4GB RAM सोबतच 64GB इंटरनल स्टोरेज असून त्याची किंमत 12,999 रू आहे आणि 4 GB RAM सह 128GB इंटरनल स्टोरेज असलेल्या मॉडेल ची किंमत 13,999 रू आहे. या स्मार्टफोन मध्ये 5000mAh बॅटरी पॉवर आहे.

महत्वाच्या बातम्या 

काल म्हणजेच 1 ऑक्टोबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशात 5G नेटवर्क लाँच करण्यात आले. 5G तंत्रज्ञान आल्यामुळे डिजिटल …

पुढे वाचा

Mobile