पवना धरणातून ५ हजार ९७० क्युसेकने विसर्ग सुरु

Pawna dam

पुणे : पवना धरण परिसरात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे धरणातून 5 हजार 970 क्युसेकने पाणी सेडण्यात आले असून त्यातील 2 हजार 208 क्युसेकने सांडव्यातून व हायड्रोपावरसाठी 1 हजार 400 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे शिवली पूल पाण्याखाली गेला आहे.

तीन दिवसापासुन सतत पडत असलेल्या पावसामुळे पवना सांडव्याचे सहाही दरवाजे अर्धा फुटाने उचलुन धरणाच्या सांडव्यातुन 2 हजार 208 क्युसकने पाणी सोडण्यात सुरूवात केली होती. त्यानंतरही पावसाचे प्रमाण वाढत गेल्याने पुन्हा पवना नदीतील पॅावर हाऊसने 1 हजार 400 क्युसेच पाणी सोडण्यात आले होते परंतु दिवसभरामध्ये पावसाचा जोर वाढल्याने पवना धरण परिसरामध्ये 140 मिलीमीटर एवढी पावसाची नोंद झाल्याने काल सांडव्यातुन 4 हजार 570 क्युसेकने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पावर हाऊसने 1 हजार 400 व सांडव्यातुन 4 हजार 570 असे एकुण 5 हजार 970 क्युसेकने पाणी सोडण्यात आले त्यामुळे शिवली पुल पाण्याखाली गेल्यामुळे काही गावातील नागरिकांचा पवनानगरशी संपर्क तुटला आहे.

शिवली पुलावरून पाणी गेल्याने शिवली,भडवली,येलघोल धनगव्हाण,खडकवाडी व काटेवाडी या गावांचा पवनानगर येथे येण्याचा संपर्क तुटला आहे त्यांना शिवली ते ब्राम्हणोली ह्या मोठ्या पुलावरून पवनानगरकडे यावे लागते या भागतुन मोठ्या प्रमाणावर दुग्ध व्यवसाय करणारे नागरिक आहेत त्यांना सकाळी सात वाजता दुध संकलन करण्यासाठी पवनानगर येथे यावे लागते त्यामुळे त्यांना सकाळी ब्राम्हणोली मार्गे अथवा कडधे मार्गी पवनानगर किंवा कामशेतला जावे लागत आहे.

नदीपात्रात सोडलेल्या पाण्यामुळे पिंपरी-चिंचवड परिसरातही पाण्याची पातळी वाढली असून नदीकिनारील नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. यामध्ये तसेच गणपती विसर्जनावेळीही घाटावर असलेल्या प्रशासनाच्या कर्मच्या-यांचे सहकार्य घेण्यास सांगितले आहे व विसर्जनासाठी खोल पाण्यातही जाऊ नये असे ही आवाहन करण्यात आले आहे.