fbpx

मुस्लिमांसाठी ५६ इंच छाती, पद्मावत प्रकरणी मात्र मौन ; असदुद्दीन ओवेसी

असदुद्दीन ओवैसी

टीम महाराष्ट्र देशा: ‘पद्मावत’ चित्रपटावरून करणी सेना देशभर हिंसाचार करीत आहे. तसेच अनेक ठिकाणी बसवर दगडफेक करण्यात आली. आता या वादामध्ये एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी उडी घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडेतोड शब्दात हल्लाबोल चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा पद्मावतला विरोध करणाऱ्यांपुढे सहजपणे मान तुकवत आहेत. फक्त मुस्लीमांनाच दाखवायला त्यांच्याकडे ५६ इंचाची छाती आहे, असे ओवेसी यांनी म्हटले आहे.

असदुद्दीन ओवेसी हे सध्या देशभरात तिहेरी तलाक विधेयकाच्या विरोधात जनजागृती करत आहेत. काहीदिवसांपूर्वी तिहेरी ओवेसी यांनी मुंबईतील सभेत तलाकच्या नावाखाली शरियामध्ये ढवळाढवळ केली जात असल्याचे म्हटले होते. तसेच पद्मावत चित्रपटावर बोलतांना ते म्हणाले, जेव्हा चित्रपटात राणी पद्मावतीबाबत काही चुकीचे दाखवण्यात आले तर ४ टक्के राजपूत चित्रपटाविरोधात उभे राहिले. चित्रपटगृह जाळण्याची, अभिनेत्रीचे नाक कापण्याचे तर कधी दिग्दर्शकाचे शिर धडावेगळे करण्याची धमकी देत चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करतात. ते लोक फक्त ४ टक्के आहेत. चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून ते संघर्ष करत आहेत. पण शरियत वाचवण्यासाठी आपण काय करत आहोत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. आज पद्मावत चित्रपट प्रदर्शित झाला असून एकीकडे चित्रपट पाहायला प्रेक्षकांची गर्दी झाली असून दुसरीकडे करणी सेना आक्रमक झाली आहे.मुंबईसह इतरही बऱ्याच ठिकाणी असणाऱ्या चित्रपटगृहांबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

3 Comments

Click here to post a comment