दोघांची भांडणे गोळीबारात जीव गेला तिसऱ्याचा, पुण्यात भर रस्त्यात ‘टोळीयुद्ध’

पुणे: पुणे शहरात मंगळवारी भर रस्त्यावर टोळी युद्ध पहायला मिळाले, दोन गटात सुरू असलेल्या भांडणातून झालेल्या गोळीबारामध्ये रस्त्यावरून जाणाऱ्या सुरक्षारक्षकाचा हकनाक जीव गेल्याची घटना घडली आहे. पंचय्या सिद्धय्या स्वामी (वय ५८, रा़ गंगानगर, फुरसुंगी) असे सुरक्षारक्षकाचे नाव आहे.

हडपसर भागातील फुरसुंगीमध्ये सायंकाळी ७ च्या सुमारास हा सर्व प्रकार घडला आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असणारे मयुर गुंजाळ व तेजाब कल्याणी यांच्यामध्ये भांडणे सुरु होती, यावेळी तेजाबने आपल्या पिस्तुलातून मयुरवर गोळी झाडली, पण गोळी मयूरला न लागता काम संपवून घरी चाललेले पंचय्या स्वामी यांच्या पायावर लागली. त्यांना तातडीने नोबेल रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, फुरसुंगीमधील या दोन गटात त्यामुळे तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी तेथील बंदोबस्तात वाढ केली आहे. गुंजाळ आणि कल्याणी याच्या शोधासाठी पोलिसांनी परिसरात झडती घेण्याचे काम सुरू केले आहे.

महत्वाच्या बातम्या