येवला मतदारसंघातील नागरी सुविधांसाठी विशेष अनुदानातून ५५ लाखांची कामे मंजूर

येवला : येवला विधानसभा मतदारसंघातील मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान या योजनेतून छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून ५५ लाखांच्या विकास कामांना मंजुरी मिळाली असून लवकरच या विकास कामांना सुरुवात होणार असल्याचे भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे यांनी सांगितले आहे. मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी विशेष अनुदान योजनेतून निफाड तालुक्यातील विंचूर येथे भूमिगत गटार करणे १० लक्ष, विंचूर येथील दिव्या हॉटेल ते क्लासिक पार्क परिसर रस्ता काँक्रीटकरण १० लक्ष, खडक माळेगाव येथील मारुती मंदिर प्रदक्षिणा गल्ली ते बैरागी मठ रस्ता कॉंक्रीटीकरण करणे ५ लाख, टाकळी विंचूर येथील वज्रेश्वरी मंदिर रस्ता कॉंक्रीटीकरण करणे १० लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच येवला तालुक्यातील पाटोदा येथील ध्यानी नदी येथील भूमिगत गटार करणे १० लक्ष, तर मुखेड येथील चावडी गल्ली भूमिगत गटार करणे १० लक्ष या कामांचा यात समावेश आहे. अशी एकूण ५५ लक्ष रुपयांची कामे मंजूर करण्यात आली असून या कामांना लवकरच सरुवात होणार असल्याचे लोखंडे यांनी सांगितले.