राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ५४ आमदार स्वकर्तुत्वाने निवडून आले ; शरद पवारांच्या ‘त्या’ सभेमुळे नाही

सिंधुदुर्ग :शरद पवारांनी मागच्या वर्षी आजच्याच दिवशी म्हणजे १८ ऑक्टोंबर रोजी साताऱ्यात भर पावसात सभा घेतली होती आणि त्या पावसातल्या सभेमुळे राज्यातील लोकांच्या मनात शरद पवारांविषयी प्रचंड आदर निर्माण झाला आणि यातूनच राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाच्या जागा वाढल्या असल्याचे अस्नेक राजकीय विचारवंत बोलून दाखवतात.आणि यामुळेच मोदी – शहांची रणनिती सुद्धा राज्यात फेल गेली.

आज त्या घटनेचे स्मरण सगळेच करत असतांना सिंधुदुर्ग चे माजी खासदार निलेश राणे यांनी आपले वेगळेच मत व्यक्त केले आहे.राणे यांनी ट्वीट करत असे म्हटले की ‘सगळे पैलवान उभ्याने लोळवले तरी २८८ पैकी ५४ आले… आणि ५४ पैकी अनेक आमदार स्वतःच्या कर्तुत्वावर निवडून आले पक्षामुळे नाही.

त्याचबरोबर त्यांनी मराठी वृत्त वाहिनी झी २४ तास यांची एक बातमी शेयर केली आहे आणि म्हटले की या वाहिनीचे एन.सी.पी.२४ तास करायला पाहिजे.

महत्वाच्या बातम्या-