उद्यापासून या 15 ठिकाणी वापरता येणार 500 च्या नोटा

500 च्या नोटा

मुंबई, दि. 24 – जुन्या 500 आणि 1000 रूपयांच्या नोटा उद्यापासून बँकांमध्ये बदलता येणार नाहीत. मात्र, 30 डिसेंबरपर्यंत या नोटा तुम्ही तुमच्या बँक खात्यात जमा करु शकणार आहात.  500 च्या जुन्या नोटा 15 डिसेंबरपर्यंत महत्वाच्या ठिकाणी चालणार आहेत.  तर, 1000 रुपयांच्या नोटा आता बँक अकाऊंटमध्येच जमा कराव्या लागणार आहेत.

1 – प्रिपेड मोबाईलवर 500 चं टॉपअप रिचार्ज करण्यासाठी
2 – केंद्रीय किंवा राज्य सरकारी महाविद्यालयांमधील फी भरण्यासाठी
3 – सरकारी रूग्णालय
4 – रेल्वे तिकीट आणि रेल्वे कॅटरींगमध्ये
5 – विमानाचं तिकीट घेण्यासाठी
6 – पेट्रोल पंप
7 – मेट्रो ट्रेन तिकीट
8 – डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनसह मेडिकलमध्ये
9- एलपीजी गॅस सिलेंडर घेताना
10 – वीज आणि पाणी बिल भरण्यासाठी
11 – सरकारी संस्थांमधील कर आणि दंड भरण्यासाठी
12 – सरकारी केंद्रांतून बियाणं खरेदी करण्यासाठी
13-  ग्राहक को-ऑपेरिटिव्ह स्टोअर्समध्ये 500च्या जुन्या नोटा स्वीकारल्या जातील. पण त्याची मर्यादा 5000 पर्यंत असणार आहे.
14- केंद्र सरकार , राज्य सरकारी शाळा, महानगरपालिकेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांच्या फीसाठी 500च्या जुन्या नोट्या स्वीकरल्या जातील. मर्यादा 2000 रूपयांपर्यंत.
15- 3 डिसेंबरपासून 15 डिसेंबरपर्यंत टोल नाक्यावर जुनी 500 रुपयांची नोट स्वीकारली जाईल.