औरंगाबाद जिल्ह्याच्या आरोग्य विभागाच्या ताफ्यात नवीन ५० रुग्णवाहिका

ambulances

औरंगाबाद : १४ व्या वित्त आयोगाच्या ग्रामपंचायत स्तरावरील व्याजाच्या रक्कमेतून तसेच जिल्ह्यातील आमदारांच्या स्थानिक निधी व ईतर योजनेतून औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या एकूण ५० रुग्णवाहिका दाखल झाल्या. या रुग्णवाहिकांचे लोकार्पण महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. शनिवारी ( दि.११) औरंगाबाद जि. प.च्या प्रांगणात हा लोकार्पण सोहळा पार पडला. जिल्ह्यातील ५० प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रत्येकी एक याप्रमाणे या रुग्णवाहिका मिळणार आहेत.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना रामराव शेळके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत या रुग्णवाहिका गोरगरीब रुग्णांना तसेच कोरोना संकट गेल्यानंतर देखील गरजू रुग्णांना सेवा देत राहील असा विश्वास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी बोलतांना व्यक्त केला. जिल्ह्यातील आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे.

कोरोना संकटात जिल्हा आरोग्य केंद्राची कामगिरी अतिशय कौतुकास्पद राहिली. आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्यात असून लवकरच आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. १४ व्या वित्त आयोगाच्या व्याजावरील रक्कम पुण्याला पडून होती. यासाठी पाठपुरावा करून वित्त आयोगाच्या व्याजाच्या रक्कमेतून जिल्ह्यासाठी २० रुग्णवाहिका खरेदी केल्या. सामान्यांच्या रुग्णसोयीसाठी या रक्कमेचा वापर होणार असल्याने याचे समाधान होत असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या