राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांना विमा रक्कम तात्काळ मिळावी

टीम महाराष्ट्र देशा : अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातल्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी, तसंच राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तात्काळ मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केंद्र शासनाकडे केली. राज्यातील ओल्या दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर प्राथमिक अहवाल सादर केला.

राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तात्काळ मिळावी, यासाठी गृहमंत्री अमित शहा लवकरच विमा कंपन्यांची बैठक घेणार असून शेतकऱ्यांना ही मदत लवकरात-लवकर मिळेल. याशिवाय राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक लवकरच पाठवण्याचे निर्देश अमित शहा यांनी दिले आहेत, असंही मुख्यमंत्र्यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

Loading...

अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याचं काम उद्यापर्यंत युद्धपातळीवर पूर्ण करावं असे निर्देश, मुख्य सचिव अजोय मेहता यांनी काल दिले. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. जिल्हानिहाय कृषीक्षेत्राचं किती नुकसान झाले याची माहिती घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पंचनाम्यांचं काम जलद गतीनं करताना ते अचूकपणे होईल याकडे लक्ष द्यावं अशी सूचनाही मुख्य सचिवांनी केली.

राज्याच्या विविध भागात झालेल्या अवकाळी पावसाचा तडाखा आंबा, द्राक्ष आणि संत्री यासारख्या फळपिकांना बसला असून त्याचा विपरीत परिणाम फळ निर्यातीवरही होणार असल्याची भीती राज्य कृषी निर्यात संस्थेने व्यक्त केली आहे. राज्यातील सुमारे 53 हजार हेक्टर क्षेत्रावरील आंबा, द्राक्ष आणि संत्री पिकांचं अवकाळी पावसानं नुकसान झालं असून शिल्लक फळांच्या दर्जावर परिणाम झाला आहे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?