मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे पेट्रोलच्या किंमती आणखी होणार कमी

मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे पेट्रोलच्या किंमती आणखी होणार कमी

PM Narendra Modi - Petrol price hike

नवी दिल्ली: देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत, त्यामुळे सामान्य माणसाला चांगलीच आर्थिक झळ लागत आहे. पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel price hike) दराने शंभरी पार केली आहे. पेट्रोलचे वाढते दर पाहता केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी अबकारी कर कमी करून दरात घट केली असली तरी बहुतेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर शंभरच्या जवळपास आहेत. या वाढत्या महागाईवरून विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर जोरदार टीका देखील करत आहे.

केंद्र सरकारने इंधनावरील अबकारी कर कमी केल्यानंतर सलग 20 दिवस पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही क्रूडचे (Crued Oil) दर कमी झाले आहे. मागील काही दिवसांत क्रूडचे दर प्रति बॅरल 84 डॉलरवर गेले होते. मागील दहा दिवसांत हे दर 78 डॉलरपर्यंत कमी झाले आहेत. अशातच आता केंद्र सरकारने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. त्यामुळे इंधनाचे दर आणखी कमी होणार असल्याचे बोलले जात आहे.

केंद्र सरकारने आपल्याकडील कच्च्या तेलाच्या आपत्कालीन राखीव साठ्यातील 50 लाख बॅरलचा साठा खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारनं पहिल्यांदाच असा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. अमेरिका, चीन, जपान, दक्षिण कोरिया आदी प्रमुख इंधनाचे ग्राहक असलेल्या देशांसोबत समन्वय साधत भारताने हे पाऊल उचलल्याचं समजते. प्रत्येक देशाकडे असा साठा असतो. आपत्कालीन स्थितीत इंधनाची कमतरता भासू नये, यासाठी हा साठा केला जातो. आता हा साठा कधी खुला केला जाणार आहे याची अद्याप कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या: