औरंगाबादेत ‘सारी’च्या रुग्णांमध्ये निघताहेत ५० टक्के कोरोनाबाधित!

corona bed

औरंगाबाद : शहरात कोरोना संसर्ग वाढत असतांना सारीच्या रूग्णांची संख्याही हळूहळू वाढते आहे. मागील काही दिवसांपासून सारीच्या रूग्णांतूनही कोरोना पॉझिटिव्ह निघणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी (दि. ५) हे प्रमाण ५० टक्के नोंदले गेले. सोमवारी शहरात सारीचे १८ रूग्ण आढळून आले. कोरोना चाचणीतून यापैकी ९ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत.

औरंगाबाद शहरात मार्च २०२० पासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला आहे. यासोबतच सारी आजारानेही शिरकाव केला आहे.शहरात वर्षभरापासून सारीचेही रूग्ण नित्याने आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. सारी आजाराची लक्षणे ही कोरोना सारखीच असल्याने शासन निर्देशानुसार प्रत्येक सारीच्या रूग्णांची कोरोना चाचणी केली जात आहे.

तसेच प्रत्येक खासगी रूग्णालयात दाखल होणार्‍या सारीच्या रूग्णांचा अहवाल रोजच्या रोज सादर करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. मात्र सारी हा आजार संसर्गजन्य नसल्याने त्याचा प्रादूर्भाव शहरात एवढा झालेला नाही. तथापि, अलीकडे सारीतूनही अनेकजण कोरोना पॉझिटिव्ह निघत असल्याने आरोग्य यंत्रणेने यावरही विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. आता तर शहरात कोरोना संसर्ग वाढत असताना सारीच्या रूग्णांतून कोरोना पॉझिटिव्ह निघणारांचेही प्रमाण वाढले आहे.

शुक्रवारी शहरात सारीचे एकूण १८ रूग्ण आढळले. त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर त्यातून ५० टक्के म्हणजे ९ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाले. आजवर सारीचे एकूण २७४४ रूग्ण आढळले आहेत. पैकी २७३५ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातून ९६९ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. तर १४०० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. आजवर १७ सारी रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या