Share

Zika Virus | कर्नाटकमध्ये 5 वर्षाच्या मुलीला झिका व्हायरसची लागणं

Zika Virus | बेंगलोर: देशातील कोरोना व्हायरस (Covid-19) चा उद्रेक आता कुठे संपत आला होता. सध्या देशात दररोज किरकोळ कोविड रुग्णांची संख्या नोंदवली जात होती. अशा परिस्थितीत देशात एक नवीन व्हायरस उत्पन्न झाला आहे. झिका व्हायरस (Zika Virus) ने देशात आता चिंता वाढायला सुरुवात झाली आहे. आठवड्या भरपूर पुण्यामध्ये झिका विषाणूचा रुग्ण सापडला होता. त्यानंतर आता कर्नाटकमध्ये एका पाच वर्षाच्या मुलीला झिका वायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे शहरानंतर कर्नाटक (Karnataka) राज्यामध्ये पहिला झिका विषाणू (Zika Virus) रुग्ण आढळून आला आहे. कर्नाटकमध्ये एका पाच वर्षाच्या मुलीला झिका व्हायरसची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर कर्नाटकचे आरोग्य मंत्री म्हणाले आहे की, “झिका विषाणूची राज्यातील ही पहिलीच घटना असून सरकार या स्थितीकडे बारकाईने लक्ष ठेवणार आहे. झिका व्हायरसला सामोरे जाण्यासाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सुसज्ज आहे.”

पुढे बोलताना के. सुधाकर म्हणाले की, “झिका व्हायरस बाबतीत सध्या सरकार अलर्ट मोडवर आहे. त्याचबरोबर सर्व खबरदारी देखील घेत आहे. राज्यातील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर, राज्यात कोणत्याही रुग्णालयात संशयित संसर्ग आढळून आल्यास झिका विषाणूची चाचणी करून घ्यावी, असे देखील अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.”

1947 मध्ये आफ्रिकन देश युगांडामध्ये या विषयाची सर्वप्रथम ओळख निर्माण झाली होती. 2016 च्या उद्रेकानंदर ब्राझीलमध्ये देखील हा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरला होता. त्यानंतर हा एक सार्वजनिक आरोग्य रोग मानला जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

Zika Virus | बेंगलोर: देशातील कोरोना व्हायरस (Covid-19) चा उद्रेक आता कुठे संपत आला होता. सध्या देशात दररोज किरकोळ कोविड …

पुढे वाचा

Marathi News

Join WhatsApp

Join Now