ई-पासच्या नावाखाली 5 हजार घेऊन नागरिकांची केली जातीये लुट, राणेंचा सेनेवर गंभीर आरोप

nitesh rane

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे कोकणातील अनेकजण हे आज मुंबई-पुण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यात अडकले होते. मात्र आता राज्य सरकारने आपल्या गावी जाण्यासाठी ई-पासची सुविधा केली असल्याने अनेकजण आता कोकणात परतत आहेत. मात्र या सुविधेत आता भ्रष्टाचार होता असल्याचं समोर आले आहे. हा भ्रष्टाचार भाजप आ. नितेश राणे यांनी उघड केला आहे.

एक ऑडीओ क्लिप ट्विटरवर पोस्ट करत नितेश राणे यांनी या ई-पासच्या माध्यमातून काहीजण लुटमार करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. नितेश राणे यांनी ई-पाससाठी एका महिलेसोबत मोबाईल संवादाचे ऑडिओ ट्वीट केले आहे. यामध्ये ही महिला ई-पास काढून देण्याची हमी देत आहे. आधार कार्ड, गाडीचा नंबर घेऊन ही महिला अवघ्या 3 तासात ई-पास काढून देते असल्याचं सांगत आहे. या पाससाठी प्रत्येकी 5 हजार रुपये दर मोजावा लागत आहे.

या घटनेवरून नितेश राणे यांनी शिवसेनाला लक्ष्य केले. ते म्हणाले की, ज्या कोकणातल्या जनतेनं शिवसेनेला सगळं काही दिले त्या जनतेला सरकारकडूनच लुटले जात आहे. अशा एजंटला कोणाची मदत आणि आशीर्वाद आहे याची चौकशी झाली पाहिजे.

विशेष म्हणजे, राज्य सरकारकडून ई-पास देण्यासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातूनच ई-पास दिले जात आहे. असं असतानाही पैसे देऊन पास देण्याचा प्रकार घडत असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

कोरोनानंतर भारतावर आले नैसर्गिक संकट, अतिउष्णतेमुळे राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी

कोरोना को हाराना है ये हमारा ब्रिद, आज आई है मुस्लीम समाज की ईद : आठवलेंच्या कवितेतून शुभेच्छा

हे आहेत खरे हिरो ! मुळचे नगरचे मात्र तेलंगणात कार्यरत असलेले IPS भागवतांनी केले मोठे कार्य