भारतीय हवाईदलाचे हेलिकॉप्टर कोसळले; सात जवानांचा मृत्यू

सकाळी सहाच्या सुमारास Mi-17 V5 हे हेलिकॉप्टर कोसळलं.

भारतीय हवाईदलाचा कणा मानला जाणाऱ्या ‘एमआय १७ व्ही ५’ हेलिकॉप्टरचा अपघात झाला. अरुणाचल प्रदेशातील तवांग परिसरात शुक्रवारी सकाळी हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली.  या दुर्घटनेत हवाई दलाच्या सात जवानांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी असल्याचे समजते. तांत्रिक बिघाडामुळे हे हेलिकॉप्टर कोसळल्याचं सांगण्यात येत आहे.

चीनच्या सीमेपासून अवघ्या 12 किमी अंतरावर ही दुर्घटना घडली.  या दुर्घटनेनंतर वायूदलाने तातडीने बचाव पथक घटनास्थळी पाठवलं आहे. हे हेलिकॉप्टर आर्मीसाठी एअर मेंटेनेंस साहित्य घेऊन जात होतं. या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे

You might also like
Comments
Loading...