गटविकास अधिकाऱ्यासह ५ जण ACB जाळ्यात

crime

 

अकोला/सचिन मुर्तडकर : अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल केलेल्या मोठ्या कारवाहीतअकोला पं.स.च्या श्रेणी-१ असलेल्या गटविकास अधिकारी गजानन.के.वेले यांचेसह सहाय्यक गटविकास अधिकारी सुधाकर पंडे, विस्तार अधिकारी आर.के.देशमुख व स्वच्छ भारत अभियानातील कंञाटी समुह समन्वयक स्वप्निल बदरखे ,समुह समन्वयक प्रशांत टाले व एका सरपंच चा मुलगा असलेला खाजगी व्यक्ती ची भूमिका बजाविणाऱ्या नितीन ताथोड यांनी १४ हजार ९०० रुपयांची लाचेची मागणी केल्याप्रमाणे ते लाच घेतांना सापळ्यात रंगेहाथ सापडले .  यामध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी पंडे यांना वगळता गटविकास अधिकारी वेले सह ४ जणांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत ताब्यात घेण्यात आले आहे.
अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक संजय गोर्ले यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.ईश्वर चव्हाण,पो.नि.मंगेश मोहोड,व पोलीस कर्मचारी यांनी प्राप्त तक्रारीनुसार पंतप्रधान स्वच्छ भारत अभियानांतर्गत ९ शौचालय बांधल्या गेलेल्या शौचालयाचे प्रत्येकी १२ हजार असे १लक्ष ८ हजार रुपये शासकीय अनुदान बिल मंजूर होऊन मिळावे या करिता लाचेची मागणी झाल्याने तक्रारदारांने त्याचे व इतर ८ जणांचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्रकरण दाखल केले होते.आरोपींनी अनुदान बिल मंजूर होण्याकरीता त्यांच्या कार्यप्रणाली प्रमाणे त्या अनुदान बिलावर आप-आपले नेमून दिलेले शासकीय कर्तव्य करणे करीता तक्रारकर्त्यांकडुन वैयक्तिक आर्थिक फायदा व्हावा या करीता लाचेची मागणी केली होती.त्यानुसार अकोला पंचायत समिती येथे २२ ऑगष्ट ला सापळा रचला यामध्ये गटविकास अधिकारी गजानन वेले सह इतर कर्मचाऱ्याविरुद्ध करण्यात आली आहे या घटने ने संपूर्ण जिल्हा भर खळबळ उडाली आहे