सरकारी कार्यालयात कामासाठी आलेले ५ जण निघाले पॉझिटिव्ह

औरंगाबाद : कोरोना संसर्ग पुन्हा एकदा शहरात जोमाने पसरू लागला आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यावेळी घराघरात रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरालाच कोरोनाने विळखा घातल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातील नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या निर्देशानुसार शहरातील ५ प्रमुख सरकारी कार्यालयात येणाऱ्याची अँटीजन कोरोना चाचणी सुरु करण्यात आली आहे.

मनपा मुख्यालय आज ५५ जणांची अँटीजन चाचणी घेण्यात आली यात २ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पोलीस आयुक्त कार्यालय येथे ४२ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली यात कोणीही पॉझिटिव्ह आढळून आले नाहीत जिल्हाधिकारी कार्यालयात ५४ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली यात कोणीही पॉझिटिव्ह आढळून आले नाहीत.

विभागीय आयुक्त कार्यालय येथे ५२ जणांची चाचणी घेण्यात आली यात कोणीही पॉझिटिव्ह आढळून आले नाही. आरटीओ कार्यालयात १२६ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यात ३ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या नागरिकांना पुढील उपचारासाठी कोविड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या