अमिताभ बच्चन यांच्याकडून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखांची मदत

मुंबई – पुलवामा येथील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख देण्याचे अमिताभ बच्चन यांनी जाहीर केले आहे.

जम्मू काश्मीरमधील पुलमावा येथे दहशतवाद्यांना केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सीआरपीएफचे तब्बल 40 जवान या भ्याड हल्ल्यात शहीद झाले आहेत.

देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. शहीद कुटुंबीयांच्या मदतीसाठी राज्य सरकारसह सेलिब्रिटींनी पुढाकार घेतला आहे. गौतम गंभीर आणि रिलायन्सचे प्रमुख अनिल अंबानी यांनी शहीद जवानांच्या कुटंबीयांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे. अमिताभ बच्चन यांनी प्रत्येक जवानांच्या कुटुंबीयांना पाच लाख देण्याचे जाहीर केले आहे.