५ नगरसेवकांसाठी रूसलात तसेच गोरगरीबांसाठी पुन्हा एकदा रूसा – मनसे

blank

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून शिवसेनेला धक्का देणारे व महाविकास आघाडीतील नाराजीनाट्याला कारणीभूत ठरलेले पारनेर नगर पंचायतीतील पाच नगरसेवक पुन्हा स्वगृही परतले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर हा माघारीचा निर्णय झाला आहे.

या सर्व नगरसेवकांनी मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली. या संपूर्ण घडामोडींनंतर जसे ५ नगरसेवकांसाठी रूसलात तसेच गोरगरीबांसाठी पुन्हा एकदा रूसा आणि महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ सगळ्यां कोरोनाबाधित रूग्णांना देण्याचा निर्णय घ्या. अशी मागणी मनसे नेते गजानन काळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

गजानन काळे यांनी मुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना ही महाराष्ट्रातील गोरगरीब आणि असहाय्य जनतेस अनेक आजारांवर पुरेशी शासकीय मदत मिळवून देणारी एक उत्तम योजना आहे. मात्र हीच योजना कोरोनाबाधीत रूग्णांसाठी कुचकामी ठरत असल्याचा आरोप केला आहे.

या योजनेतील अटीनुसार जर कोरोनाबाधीत रूग्ण व्हेंटीलेटरवर असेल तरच त्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो. मात्र सरकारी आकडेवारीचा अभ्यास करता एकूण रूग्णांपैकी १/२ टक्का रूग्णांनाही व्हेंटीलेटरची आवश्यकता भासत नाही. याचाच अर्थ ही योजना महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधीत रूग्णांच्या १ टक्का रूग्णांनाही फायद्याची ठरत नाही. त्यातच शासनाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एक किंवा दोनच खाजगी रूग्णालये या योजनेखाली आणल्याने ग्रामीण भागातील जनतेला याचा अजिबात लाभ मिळू शकत नाही असं या पत्रात म्हटलं आहे.

धर्मनिरपेक्षता, राष्ट्रवाद, लोकशाही, विविधता हटवून केंद्रातील भाजप आपला अजेंडा राबवू पहातंय- राष्ट्रवादी

कोल्हापूर, सांगली, सातारा भागातील संभाव्य पूरपरिस्थितीसंदर्भात कर्नाटकच्या जयंत पाटील यांची बैठक

मानखुर्द मशीदीवरील बेकायदेशीर भोंग्याविरोधात विहिंप शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट