सुरतमध्ये सभा घेवू नये यासाठी ५ कोटींची ऑफर दिली गेली; हार्दिक पटेलचा दावा

टीम महाराष्ट्र देशा: गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या एका पाठोपाठ एक फैरी झडत आहेत. असातच आता पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी ‘सूरतमध्ये रॅली न करण्यासाठी एका व्यक्तीने आपल्याला ५ कोटींची ऑफर दिली होती’ असा खळबळजनक दावा केला आहे. सूरतमध्ये रॅलीनंतर झालेल्या सभेत हार्दिक पटेल यांनी हा खुलासा केला.

आपल्याला ५ कोटींची ऑफर देणारा व्यक्ती व्यापारी असल्याच हार्दिक यांनी सांगितल. मात्र त्याचे नाव हार्दिक यांनी सांगितलं नाही. दरम्यान सुरतमधील सभेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

You might also like
Comments
Loading...