ऐतिहासिक वारसा असलेला उदगीर किल्ला दुरुस्तीसाठी ५ कोटींचा निधी: राज्यमंत्री बनसोडे

Sanjay Bansode

लातूर : महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक व पुरातन असलेला तसेच पानिपतच्या युद्धाची साक्ष असलेल्या उदगीर किल्लाचे जतन व संवर्धन करण्यासाठी आणि हा वारसा जपण्यासाठी शासनाने सुमारे पाच कोटी रुपये मंजूर केले आहेत. यातून या ऐतिहासिक वारसा असलेल्या किल्ल्याची दुरुस्ती तसेच परिसरातील विकास करण्यात येणार आहे. मराठवाड्यातील ही वास्तू पुढील काळात पर्यटनाचे एक प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाईल. राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने हा निधी उपलब्ध करून दिली असल्याची माहिती राज्याचे पर्यावरण पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.

अनेक दिवसांपासून उदगीर किल्ल्याच्या दुरुस्तीची मागणी होत होती. उदगीर शहरातील पायाभूत विकास होत असताना या शहराला असलेले ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन या शहरात असलेला किल्ला संवर्धन व जतन करणे आवश्यक होते. त्यासाठी पाठपुरावा करून उदगीर किल्ल्याच्या संवर्धनासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यातुन किल्याच्या वास्तुचे स्ट्रक्चरल आँडिट करून अहवाल तयार करणे, पुरातत्व संकेतानुसार उत्खनन करणे, किल्याच्या तंटबंदीची झाडे झुडपे काढणे, पडझड झालेल्या वास्तुच्या भिंतीची दुरूस्ती, पर्यटकांसाठी पार्किंगची व्यवस्था, स्मारकांच्या जतन दुरुस्तीची कामे इत्यादी कामे समाविष्ट करण्यात आली आहेत.

उदगीर शहराचा भौतिक विकास होत असताना या निमित्ताने संस्कृतीत विकास होत आहे. या किल्याच्या संवर्धनातुन येथील पर्यटनाचा विकास होणार आहे. शहरातील पर्यटनच्या विकासातुन नवीन रोजगार निर्मिती होणार आहे. उदगीर येथील किल्याच्या संवर्धनमुळे शहराच्या वैभवात आणखी भर पडणार आहे, अशी माहिती संजय बनसोडे यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या