चमकी तापाला 4G जबाबदार, भाजप खासदाराचे विधान

टीम महाराष्ट्र देशा : बिहारमध्ये चमकी तापाने धुमाकूळ घातला असून अनेक बालकं मृत्यूमुखी पडत आहेत. वैद्यकीय सुविधेचा अभाव असल्याने आतापर्यंत १०८ बालकांनी आपले प्राण गमावले आहेत. अशी विदारक परिस्थिती असताना भाजपच्या एका खासदाराने चमकी तापाला 4जी जबाबदार असल्याचं म्हंटल आहे. अजय निषाद असे या खासदाराचे नाव असून ते मुझफ्फरपूरचे खासदार आहेत.

निषाद यांच्या मते चमकी तापाला गाव, गरिबी,गंदगी म्हणजेच घाण आणि गरमी म्हणजेच उष्णता या बाबी कारणीभूत आहेत. त्यामुळे याबाबींवर लक्ष देण्याची विशेष गरज आहे.ते म्हणाले की, सरकारने मृत्यू कमी करण्यासाठी या चार मुद्दावर लक्ष देण्याची गरज आहे. गाव, गरिबी,गंदगी म्हणजेच घाण आणि गरमी म्हणजेच उष्णता या चार बाबींचा या बालकांच्या मृत्यूशी संबंध आहे, कारण जी बालके दगावली आहेत किंवा रुग्णालयात उपचार घेत आहे ती अतिशय गरीब घरातील आहे. यातील अनेक बालके ही अनुसूचित जातीतील असल्याने त्यांचे जीवनमान हे अत्यंत हलाखीचे आहे.

 Loading…
Loading...