कर्जमाफीसाठी ४९ हजार अर्ज, यादीत मात्र १५९ जणांची नावे

सोलापूर -राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी माढा तालुक्यातून ४९ हजार ६१८ शेतक ऱ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले असून, मंजूर पहिल्या यादीत मात्र फक्त १५९ शेतकऱ्यांचीच नावे आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांनी प्रमाणपत्र दिलेल्यांचीही नावे गायब असल्याने प्रशासनाच्या या गोंधळाविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Loading...

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिवाळीला कर्जमाफीची भेट देण्याची घोषणा केली होती. परंतु ती हवेत विरल्याचे स्पष्ट होत आहे. देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी गवगवा केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची राज्य सरकारने पहिली ग्रीन यादी जिल्हानिहाय आपलं सरकार पोर्टलवर जाहीर केली आहे. यात माढा तालुक्यातील फक्त १५९ शेतकरी समाविष्ट झाले आहेत.

यामुळे तालुक्यातील शेतक ऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. चव्हाणवाडी (टे.) येथील दीपक चव्हाण यांना लाभार्थी शेतकरी म्हणून मुख्यमंत्र्यांनी प्रमाणपत्र देऊन सपत्निक सन्मान केला आहे. मात्र चव्हाण यांचेच ग्रीन यादीत नाव समाविष्ट नसल्याची बाब समोर आली आहे

. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केवड येथील लिंबा धर्मे यांना प्रमाणपत्र दिले आहे. त्यांचेही नाव ग्रीन यादीत नाही. माढा तालुक्यातील ११८ गावांपैकी ११० गावातून ४९६१८ शेतक ऱ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. तसेच ११० गावापैकी ५७ गावामधील २१८७६ शेतक ऱ्यांचे नाव यादीत नाही. कर्जाचे गेल्या वर्षी पुनर्गठण केलेल्या शेतकऱ्यांची नावेही पहिल्या यादीत आलेली नाहीत. यासंदर्भात सहाय्यक निबंधक गावडे म्हणाले, मी अद्याप यादीच पाहिली नाही. ती यादी अद्याप डाऊनलोड झाली नाही.Loading…


Loading…

Loading...