शेतकरी कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला

आ. अनिल बाबर यांच्याकडून 47 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

सांगली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  वाढदिवसाचे औचित्य साधत आमदार अनिल बाबर यांनी शेतकऱ्यांच्या कर्ज माफीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला  मदत केली आहे. दि. 22 जुलै रोजी मुख्यमंत्री महोदय यांचा 47 वा वाढदिवस आहे. वाढदिवसाला भेट वस्तू देण्याऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्याला प्रतिसाद देत, 47 वा वाढदिवस आहे, म्हणून 47 हजार रुपयांचा धनादेश आमदार अनिल बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.
bagdure

 

आमदार बाबर यांनी दाखवलेल्या या समयसुचकतेबद्दल आणि शेतकऱ्यांच्या कर्ज माफीसाठी योगदान दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार अनिल बाबर यांचे आभार व्यक्त केले आहेत. शेतकरी कर्जमाफी निधीमध्ये अजून भर पडेल, यासाठी आमदार अनिल बाबर यांच्या कडून इतरांनी प्रेरणा घ्यावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. याबाबत फेसबुक आणि ट्विटरवर आमदार अनिल बाबर यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

 

You might also like
Comments
Loading...