fbpx

पुलवामा हल्ल्यात खरंच ४० जवान शहीद झाले होते का?, मला या आकड्यावरही शंका आहे’

टीम महाराष्ट्र देशा- पुलवामा हल्ल्यामध्ये खरोखर ४० जवान शहीद झाले होते का?, मला या आकड्यावरही शंका आहे, असं वादग्रस्त विधान नॅशनल कॉन्फरन्सचे वरिष्ठ नेते फारुक अब्दुल्ला यांनी केलं आहे. काश्मीरमध्ये एका सभेला संबोधित करताना ते बोलत होते.

केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका करताना फारुख अब्दुल्ला यांनी चक्क जवानांच्या हौतात्म्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली आहे. यापूर्वी देखील अब्दुल्ला यांनी अनेक देशविरोधी आणि सैन्याचा अपमान करणारी विधाने केली आहे. मोदी सरकारने खऱ्या मुद्द्यांवरील लक्ष्य हटवण्यासाठी पाकिस्तानसोबत युद्घजन्य परिस्थिती निर्माण केली आहे असा देखील आरोप त्यांनी केला.

पुढे बोलताना अब्दुल्ला म्हणाले, छत्तीसगडमध्ये देशाचे कित्येक जवान शहीद झाले आहेत. पण मोदी कधीही त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेले नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठीही गेले नाहीत. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र मला त्याबाबत शंका आहे.”