‘सोलापूर’च्या ४० रेल्वे पुलांची होणार पाहणी

indian railway

टीम महाराष्ट्र देशा-रेल्वेमंडळाने देशातील सर्व पुलांची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. सोलापूर रेल्वे विभागात लहान-मोठे मिळून सुमारे ४० पूल आहेत. पाऊस थांबल्याने हे काम होणार आहे. तत्काळ गरज असल्यास पुलांची दुरुस्ती लगेच करण्यास सांगण्यात आले आहे. मुंबईतील पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर रेल्वे मंडळाने देशातील सर्व पादचारी पुलांच्या पाहणीचा आदेश दिला होता.

आता सर्वच पुलांची पाहणी होणार आहे. प्रवासी सुरक्षा डोळ्यासमोर ठेवून मंडळाने हा आदेश दिला. पाहणी करण्याची सर्व जबाबदारी मुख्य पूल अभियंता यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पुलाची पाहणी करून त्याच्या स्थितीनुसार वर्गवारी करायची आहे. त्यावरून कोणत्या पुलाची दुरुस्ती प्राधान्यक्रमाने करायची त्यावर किती खर्च करायचा, हे ठरणार आहे. यासाठी मंडळाने तीन गटात वर्गवारी ठरवली आहे.

यात ओआरएन (ओव्हर ऑल रेटिंग नंबर) ते पर्यंत अशी क्रमवारी असणार आहे. पुलास क्रमांक मिळाला त्याची तत्काळ दुरुस्ती करणे गरजेचे समजले जाईल. दुसरा क्रमांक असल्यास गरजेनुसार पुलाची दुरुस्ती होईल आणि तिसरा क्रमांक असेल तर विशेष दुरुस्ती करावी, असे आदेशात म्हटले आहे. विभागातील मोठे पूल शहाबाद – कोंगणी पूल, दुधनी -बोरोटीदरम्यान बोरी पूल, मुंढेवाडी स्थानकाजवळ – सीना पूल, वाशिंबे -पोफळजदरम्यान पंढारा पूल, पारेवाडी स्थानकाजवळ -भोपालपेठ हिंगीनाला. रेल्वेमंडळाकडूनआदेश मिळाला आहे. पावसाळा संपल्यानंतर पुलाच्या ऑडिटचे काम सुरू होईल. पुलाच्या सुरक्षेसाठी ऑडिट होणे गरजेचे आहे. पुलांचे ऑडिट हे रेल्वेत नित्याचीच बाब आहे.विजयकुमारराय, विभागीय अभियंता,