औरंगाबादेत बालकांच्या कोविड सेंटरमध्ये स्वतंत्र ४ विभाग, ऑक्सीजन प्लांट, भिंतीवर चित्र आणि एलसीडी टीव्हीची व्यवस्था!

औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये बालकांना कोरोनाचा अधिक धोका असल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे शहरातील गरवारे कंपनी, कोविड रुग्णालय उभारणीया ठिकाणी बालकांसाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे काम सुरू असून आता हे काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली. याठिकाणी बालकांसाठी स्वतंत्र चार विभाग, पाण्याची व्यवस्था, स्वतंत्र स्वच्छतागृह, १३ केएलचा लिक्वीड ऑक्सीजन प्लांट, बालकांसाठी भिंतीवर चित्र, एलसीडी टीव्ही, ७२ डॉक्टर, कर्मचार्‍यांची नियुक्ती, औषधी व इतर साहित्य ठेवण्याकरिता स्वतंत्र रुम इत्यादी व्यवस्था करण्यात येत आहेत.

महापालिकेने गरवारे कंपनीच्या मदतीने १२५ बेडचे बाल कोविड रुग्णालय उभारणीचे हाती घेतलेले काम अंतिम टप्प्यात आले आहे. बेडची व्यवस्था पूर्ण झाली असून ऑक्सीजनची लाइन टाकण्यात आली आहे. तर ऑक्सीजन प्लांट उभारणीचे काम अद्याप बाकी आहे. बालकांसाठी भिंतींवर चित्र साकारले आहे. दोन एलसीडी लावले आहेत. कोविड सेंटरवर सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. सीएसआर निधीतून गरवारे कंपनीच्या शेडमध्येच १२५ बेडसचे बाल कोविड रुग्णालय उभारले जात आहे.

काम पूर्ण झाल्यानंतर ते चालवण्यासाठी पालिकेच्या ताब्यात दिले जाणार आहे. येथे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांवर उपचार केले जाणार आहेत. गरवारे कंनीने अत्याधुनिक पद्धतीने बाल कोविड सेंटर उभारले आहे. या ठिकाणी बालकांसोबत एका पालकाची राहण्याची व्यवस्था केली आहे. सर्व सुविधांनी तयार होत असलेल्या या सुसज्ज अशा या बाल कोविड रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण राठोडकर यांनी नुकतीच येथे पाहणी देखील केली.

महत्त्वाच्या बातम्या

IMP