न्यायव्यवस्था टिकली तर लोकशाही टिकून राहणार: सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती

4-senior-supreme-court-judges-address-media-for-the-first-time-live-updates

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टातल्या चार न्यायमूर्तींची पत्रकार परिषद जस्टीस लोया प्रकरणाशी संबंधित. याबाबत त्यांनी सकाळी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांची भेट घेतलेली. पण समाधान न झाल्याने ते मीडियासमोर आले. आम्ही आमचा आत्मा विकला, असं आम्हाला भविष्यात कोणीही बोलू नये असे न्यायमूर्ती पत्रकार परिषेदेत बोलत होते.

न्यायव्यवस्था टिकली नाही, तर लोकशाही टिकून राहणार नाही तसेच गेल्या काही महिन्यांपासून सुप्रीम कोर्ट प्रशासन नीट काम करत नसल्याचे त्यांनी सांगितले. सरन्यायाधीशांना लिहिलेलं पत्र सार्वजनिक करणार

न्यायशास्त्राच्या इतिहासातील अभूतपूर्व घटना, ही पत्रकार परिषद बोलवताना आम्हाला अजिबात आनंद होत नाही. खटकणाऱ्या गोष्टी सरन्यायाधीशांना काही गोष्टी सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण ते निष्फळ ठरल्याचे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्तीने सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर