लसीकरण झालेले, अँटिबॉडिज असलेले वगळता ४ लाख औरंगाबादकर तिसऱ्या लाटेत होणार बाधित

औरंगाबाद : केंद्र शासनाने देशातील ४० कोटी नागरिकांना कोरोना संसर्गाच्या तिसर्‍या लाटेत बाधा होण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यानुसार शहरातील सुमारे चार लाख नागरिकांना संसर्गाचा धोका होऊ शकतो. असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ऑगस्ट महिन्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये लहान बालकांना देखील अधिक धोका असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

केंद्र शासनाने देशातील २१ राज्यातील ७० जिल्ह्यात केलेल्या चौथ्या राष्ट्रीय सेरो सर्व्हेचे निष्कर्ष मंगळवारी जाहीर करण्यात आलेले आहे. त्यानुसार सुमारे ४० कोटी नागरिकांना तिसर्‍या लाटेत संसर्गाचा धोका असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तिसरी लाट ऑगस्ट महिन्यात येण्याचा अंदाज असून या सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुमारे चार लाख नागरिकांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी यापूर्वीच असा अंदाज व्यक्त केला होता.

त्यांच्या म्हणण्यानुसार सुमारे एक लाख चार हजार नागरिक बाधित झाले होते. शहराच्या २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ही साधारणपणे १२ लाख एवढी आहे. तर सध्याची लोकसंख्या सोळा-सतरा लाख गृहित धरली जाते. त्यानुसार महापालिकेला ११ लाख ७६ हजार ९९९ नागरिक लसीकरणाचे उद्दीष्ट आहे. आतापर्यंत पाच लाख २७ हजार नागरिकांची लसीकरण झाले आहे. तर कोरोना होऊन गेल्यामुळे अँटिबॉडिज तयार झालेल्या नागरिकांची संख्या अडीच लाख एवढी आहे. त्यामुळे आठ लाख नागरिकांमध्ये प्रतिकारशक्ती तयार झालेली आहे. त्यामुळे उर्वरित चार लाख नागरिकांना कोरोना संसर्गाचा अधिक धोका आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP