नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर येथे ट्रॅव्हल्स उलटून चार जण ठार

प्रतिनिधी ( ज्ञानेश्वर राजुरे): देगलूर हुन नांदेडकडे जाणारी ट्रॅव्हल्स उलटून तीन प्रवाशासह चौघांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे . गुरुवारी सायंकाळी शेवट वृत्त हाती आलं तेव्हा एकून 12 प्रवाशी जखमी झाले असून. मृतांमध्ये देगलूर मधील आई आणि मुलीचा समावेश आहे.
ट्रॅव्हल्स चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हि दुर्दैवी घटना घडली असून, गाडीच्या डाव्या बाजूला दरवाजाजवळच सीट वर बसलेल्या देगलूर मधील शीतल निवृत्ती कांबळे आणि सुनीता निवृत्ती कांबळे तर तेलंगणा राज्यतील थंडी हिप्परगा येथील गंगाधर परमेशु भुरळे आणि क्लिनर मारोती बरबडे,(रा नायगाव) हे ट्रॅव्हल्स खाली दाबल्या गेल्याने जागीच मरण पावले सुनीता कांबळे आपल्या दोन मुलांना घेऊन भावाच्या लग्नाला जात असताना हा काळाचा घाला त्याच्यावर झाला मुलगी मुलगी शीतलचा मृत्यू झाला तर मुलगा बुद्धभूषण यांच्या डोक्याला मर लागल्याने सर्व जखमींना देगलूर च्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात अधिक उपचार सुरु आहेत. तर जखमींपैकी काही अपघात ग्रस्तांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आलंय.
ट्रॅव्हल्स उलटली हे पाहताच नागरिकांनी अपघात स्थळी मोठी गर्दी केली आणि जखमींना गाडीतून बाहेर काडण्यास मदत केली एका दोरखंडाच्या साह्यान आडवी पडलेल्या ट्रॅव्हल्स ला उभी करण्यात नागरिकांनी मदत केली.

You might also like
Comments
Loading...