fbpx

शूरवीर जिवा महाले यांचे वंशज जगत आहेत हलाखीचे जीवन

टीम महाराष्ट्र देशा :छत्रपती शिवाजी महाराज यांचा वीर मावळा जिवा महाला हे महाराजांचे  अंगरक्षक होते तसेच त्यांनी  प्रतापगडावर अफजल खानाशी महाराज लढा देत असताना महाराजांवर वार करणाऱ्या सय्यद बंडाचे त्यांनी हात छाटले होते. अत्यंत  चपळाईने महाले यांनी महाराजांचे प्राण वाचवल्यामुळे  होता जिवा म्हणून वाचला शिवा ही म्हण प्रचलीत झाली.छत्रपती शाहूराजांनी १७०७ मध्ये जिवाच्या वंशजांना निगडे/साखरे ही गावे इनाम दिली. त्या इनामपत्रात जिवा महाला यांच्या मर्दानी, पुरातन व एकनिष्ठ असा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.परंतु या शूर मावळ्याचे वंशज हलाखीचे जीवन जगत असल्याचं वास्तव भिवंडीचे डॉ. सोन्या पाटील यांनी उघडकीस आणली  आहे .

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात कृष्णानदीच्या तीरावर कोंढीवली हे ६३६ लोकसंख्या असलेले असलेले गाव आहे. येथे ३३ कुटुंबे वास्तव्य करतात. याच गावात या वीर जिवा महालाचे १३ वे वंशज राहतात. प्रकाश बाळकृष्ण सपकाळ असे त्यांचे नाव आहे. त्यांची पत्नी जयश्री व दोन मुले प्रतिक्षा, व प्रतीक, यांच्यासोबत एका झोपडीमध्ये ते राहत आहेत. प्रतीक सातवीमध्ये शिकत असून प्रतीक्षा नुकतीच दहावी उत्तीर्ण झाली आहे. प्रकाश यांना पॅरेलिसीस (लखवा) असल्यामुळे ते अंथरुणावर खिळून आहेत .जिवा महालाच्या वंशजांना मोल-मजुरी करून आपले पोट भरावे लागत असल्याची बाब भिवंडीचे डॉ. सोन्या पाटील यांनी उघडकीस आणली होती.

arjun raje

छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जिवाजी बाजी लावणाऱ्या महालाच्या वंशजांची हि परिस्थिती महाराजांचे अर्जुनराजे भोसले यांना समजली .अधिक माहिती घेतली असता प्रकाश हे स्टार हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचारासाठी दाखल झाले असल्याचे  समजले . अर्जुनराजेंनी स्वतः तिथे जाऊन त्यांची परिस्थिती समजावून घेतली व त्याना वैद्यकीय खर्चा साठी मदत केली.महाला यांच्या वंशजांप्रमाणे स्वराज्यासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या इतर शूरवीर मावळ्यांच्या वंशजांचा शोध घेवून शासनाने त्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे. बहुतांश वंशज अशाच पद्धतीने हलाखीचे जीवन जगत आहेत का ? याची चौकशी करून आर्थिकदृष्ट्या त्यांना स्वयंपूर्ण कसं बनवता येईल याची उपाय योजना करणे आवश्यक आहे .

जीवा महाला यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन