हिंगोलीत ३८ नवे रुग्ण, एकाचा मृत्यू; जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचे ३८ नवे रुग्ण आढळून आले असून शहरातील आयसोलेशन वार्डातील एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, मंगळवारी ३ रुग्णांनी कोरोनावर मात केली त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.दरम्यान जिल्ह्यात आजपर्यंत ३ हजार ९५४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील ३ हजार ७५५ रूणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. जिल्ह्यात आतपर्यंत कोरोनामुळे ५९ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या १४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने २४ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार आहे. या दरम्यान होणाऱ्या लग्ण समारंभांना परवानगी आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले आहे.

दरम्यान, संचारबंदीच्या कालावधीत दुध विक्री केंद्र, दुध विक्रेते यांना सायंकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत मुभा असणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकिय, कार्यालये, बँका चालू राहतील. संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना ये जा करण्यासाठी मुभा असे मात्र त्यांच्याकडे ओळखपत्र असणे बंधनकारक असणार आहे. खासगी रुग्णालयांशी संलग्नीत मेडिकल रुग्णालयाच्या वेळेनुसार आणि आपत्कालीन परिस्थितीत आवश्यकतेनुसार चालू ठेवण्यास मुभा आहे.

महत्त्वाच्या बातम्या