लोकसभेच्या ३७० मतदारसंघात ईव्हीएममुळे घोळ : राज ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ईव्हीएम मशीन संदर्भात मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेले होते. या भेटीमध्ये राज ठाकरे यांनी ईव्हीएम मशीन बाबत आपली भूमिका मांडली. तर या भेटीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, गेल्या ३० वर्षांपासून ईव्हीएमवर लोक संशय घेत आहेत. त्यामुळे बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्यास त्यात स्पष्टता येईल आणि लोकांचा विश्वासही बसेल. तसेच ३७० लोकसभा मतदारसंघात ईव्हीएममुळे घोळ झालाय. या मतदारसंघात जास्तीचं मतदान मोजलं गेलं आहे.

यावेळी राज यांनी भाजपवरही टीका केली, ‘ज्या देशात दोन महिने निवडणुका चालतात, तिथे दोन दिवस मतमोजणी झाली तर बिघडले कुठे? असा सवाल राज यांनी केला. तसेच मला निवडणूक आयोगाकडून शून्य अपेक्षा आहे. तुम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार का केली नाही? प्रश्न भविष्यात पत्रकारांनी विचारू नये यासाठी ही औपचारिक भेट घेतली आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

IMP