३६ लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा म्हणजे ‘सरसकट’ कर्जमाफी – मुख्यमंत्री

वेबटीम: राज्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना सरकारने तत्वत, सरसकट अशा प्रकारचे शब्द वापरल्याने शेतकऱ्यामध्ये संभ्रमावस्था होती. आता राज्य सरकराने शेतकऱ्यांसाठी केलेल्‍या सरसकट कर्जमाफीचा अर्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला आहे. कर्जमाफीची घोषणा करताना आम्ही सर्व अटी काढून टाकत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. म्हणून ही सरसकट कर्जमाफी आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले. कर्जमाफीमुळे ३६ लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असून, चुकीच्या व्यक्तींना कर्जमाफीचा लाभ मिळू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री बोलत होते. ‘देशातील इतर राज्यांनी कर्जमाफीची घोषणा करताना विविध अटी शर्ती लादल्या आहेत. मात्र महाराष्ट्रात कर्जमाफीची घोषणा करताना आम्ही या सगळ्या अटी काढून टाकत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. म्हणून ही सरसकट कर्जमाफी असल्‍याचे मुख्यमंत्री यावेळी म्‍हणाले.

आजपर्यंत कोणत्याची सरकारने शेतकऱ्यांसाठी आम्‍ही केला तेवढा खर्च केलेला नाही. तसेच पेरण्या उशिरा करा म्हणून आम्ही शेतकऱ्यांना एसएमएस पाठवला आहे. पाऊस उशिराने होईल, दुबार पेरणी टाळण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांची काळजी घेत असल्याचे  फडणवीस यांनी सांगितले.

You might also like
Comments
Loading...