‘त्या’ ३५ फूटी झाडूची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद

मुंबर्इ : मीरा-भार्इंदर झोपडपट्टीतील काही महिलांनी ‘विल इंडिया चेंज’ फाऊंडेशनच्या मदतीने नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्याच्या उद्देशाने ३५ फूट झाडू तयार केला. आज ‘मॅक्सेस मॉल’मध्ये महापौर डिंपल मेहता यांच्या हस्ते या भल्या-मोठ्या झाडूची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाल्याचे जाहीर करण्यात आले. हा झाडू बनविण्यासाठी झाडूच्या एका प्रतिष्ठित कंपनीने सहकार्य केले.

सुहासिनी साकीर यांच्या मार्गदर्शनाखाली फक्त १ तास १५ मिनिटांत हा झाडू बनवण्यात आला. हा झाडू बनविण्यामागे पंतप्रधान मोदी यांच्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाला सहकार्य करण्याचा हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले