१० पटसंख्या असलेल्या आणखी ३४ शाळा बंद होणार ?

कोल्हापूर/मुंबई : जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येत असलेल्या १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ३४ शाळा बंद होण्याची शक्यता आहे. १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले होते. यानुसार जिल्ह्यातील ३४ शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान, या शाळांतील विद्यार्थ्यांचे जवळच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत समायोजन करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

अनेक प्राथमिक शाळांतील शिक्षकांची मुलेही खासगी शाळांमध्ये जात असल्याने पटसंख्या प्रत्येक वर्षी कमी होत चालली आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता एक विद्यार्थी असलेल्या गावांत, वाड्या-वस्त्यांवर द्विशिक्षकी शाळा अनेक वर्षांपासून सुरू आहेत.