३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा नियोजनबद्ध आराखडा करावा – विकास खारगे

Van Vibhag Meeting

मुंबई, दि. 17 : पुढील वर्षीच्या पावसाळ्यातील नियोजित 33 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करावा,अशा सूचना वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी आज दिल्या.

2019 मधील 33 कोटी वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन व पूर्वतयारीबाबत सर्व प्रशासकीय विभागांच्या समन्वय अधिकाऱ्यांची बैठक श्री. खारगे यांच्या अध्यक्षतेखाली आज आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी, वन विभागाचे विशेष वन अधिकारी डी. एल. थोरात यांच्यासह विविध प्रशासकीय विभागांचे सहसचिव, उपसचिव आदी अधिकारी उपस्थित होते.

Loading...

यावेळी श्री. खारगे यांनी प्रशासकीय विभागनिहाय वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट,नियोजनाचा आढावा घेतला. ते म्हणाले, उद्दिष्टाच्या पूर्ततेच्या दृष्टीकोनातून विभागांनी आपल्या अधिनस्त कार्यालयांच्या जागेचा वापर वृक्ष लागवडीसाठी करावयाचा आहेच; परंतु, विभाग ज्या घटकांना सेवा पुरवितात तसेच जे लाभार्थी,घटक विभागांचे सेवा ग्राहक आहेत अशांचाही उपयोग या मोहिमेमध्ये करुन घ्यायचा आहे. अशा सर्व पर्यायांचा विचार करुन वृक्षारोपणासाठी उपलब्ध जमिनीची माहिती (लॅण्ड बँक) वन विभागाला द्यावी.

राज्य स्तरावर उत्कृष्ट काम केलेल्या विभाग, व्यक्तींचा सत्कार

 यावर्षीच्या पावसाळ्यात राज्यस्तरीय वृक्षलागवड कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य केलेल्या विभाग व नाविन्यपूर्ण कल्पना राबवत पुढाकार घेतलेल्या व्यक्तींचा सत्कार पुढील महिन्यात करण्यात येणार असून त्यासाठी 30 सप्टेंबर 2018 पर्यंत आपल्या कामाची छायाचित्रे, चित्रफीतीसह लेखी प्रस्ताव पाठवावा.

1 कोटी हरित सेना स्वयंसेवकांची फौज उभारण्याचे उद्दिष्ट

 भारतातच नव्हे तर जगातही नाविन्यपूर्ण अशी हरित सेना ही संकल्पना राज्यामध्ये राबविण्यात येत आहे. 1 कोटी हरित सेना स्वयंसेवकांची फौज उभारण्याचे  उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी चालू वर्षामध्ये सर्व शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच विभागांच्या लाभार्थ्यांची हरित सेनेमध्ये नोंदणी करावयाची आहे. राज्यातील कोणतीही युवा ते वृद्ध व्यक्ती हरित सेनेची स्वयंसेवक होऊ शकेल. अधिकाधिक स्वयंसेवक नोंदणीसाठी शाळा,महाविद्यालये आदी ठिकाणी शिबीरांच्या माध्यमातून काम करावे लागेल. तसेच सर्व विभागांनी आपल्याशी संबंधित लाभार्थी घटकांची नोंदणी करुन घ्यायची आहे.

यावर्षी केलेल्या वृक्ष लागवडीची छायाचित्रे, चित्रफीती 30 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अपलोड करावी. सर्व वृक्ष लागवडीचे जिओ टॅगिंग तसेच जिवंत रोपांची माहिती अपलोड करावी. पाऊस पडला नाही अशा ठिकाणी करण्यात आलेल्या वृक्षरोपांसाठी पाण्याची व्यवस्था करावी. वृक्षारोपण कार्यक्रमाचे संनियंत्रण करावे,आदी सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
तळीरामांना दारूवाचून राहावेना; पठ्ठ्यांनी 'यूट्यूब'वर पाहून घरीच तयार केली दारू
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
अमेरिकेत 'कोरोना'चं थैमान; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितला 'मदतीचा हात'
... तर 'लॉकडाऊन'चा कालावधी वाढवावा लागेल; राजेश टोपे यांची माहिती