नीता अंबानींचा खास फोन. . . किंमत फक्त 315 कोटी

वेबटीम : जगातील श्रीमंत व्यक्तींच्या मोजक्या यादीत प्रामुख्याने नाव असणारे उद्योगपती मुकेश अंबानी. यांच्या पत्नी नीता अंबानी या आपल्या लक्झरी लाइफस्टाइलमुळे चर्चेत असतात. नीता अंबानी यांची दिवसाची सुरुवातच होते ती तब्बल ३ लाख रुपयांच्या चहाने. मध्यंतरी नीता यांचा हाच चहा बराच चर्चेत आला होता. मात्र, आत त्यांच्याकडील मोबाईलची किंमत ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

‘एशियानेटन्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, नीता अंबानी या ‘फॉल्कन सुपरनोटा आयफोन ६ पिंक डायमंड’ हा फोन वापरतात.  ४८.५ मिलियन डॉलर म्हणजे जवळपास ३१५ कोटी इतकी या फोनची किंमत असल्याचं सांगितलं जाते.  २०१४ मध्ये हा फोन लॉन्च झाला होता. या फोनच्या किमतीत एखादे खासगी मालकीचे जेट विमान खरेदी करता येईल. फोनशिवाय त्या जगातील सर्वात महागडी हॅंडबॅग देखील वापरतात. ३० ते ४० लाख इतकी त्यांच्या हॅंडबॅगची किंमत बोलले जाते.

या कोट्यवधींच्या फोनची वैशिष्ट्ये –

  • २०१४ मध्ये हा फोन लॉन्च झालाय
  • २४  कॅरेट सोन्याचा फोन असून तो पिंक गोल्डपासून बनविण्यात आलाय.
  • लिमिटेड एडिशन असलेल्या या फोनची निर्मिती कंपनी मागणीनुसार करते.
  • या स्मार्ट फोनला हॅक करण्याचा प्रयत्न झाला तरीही मालकाला अलर्ट जातो
  • फोनवर प्लॅटिनमची कोटिंग असल्यामुळे हा फोन तुटू  शकत नाही.

 

 

You might also like
Comments
Loading...