मुख्यमंत्र्यांच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ वर असतील तब्बल ३१ टोलनाके?

समृद्धी महामार्गावर तब्बल ३१ टोलनाके, माहिती अधिकारामध्ये ही माहिती झाली उघड

टीम महाराष्ट्र देशा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेला समृद्धी महामार्गावर तब्बल ३१ टोलनाके असतील अशी माहिती माहिती अधिकारामध्ये उघड झाली आहे.

bagdure

महाराष्ट्रात टोल नाक्यावरून अनेक वेळा राजकारण तापत असते आणि आता या महामार्गावर नव्याने अस्तित्वात येणाऱ्या तब्बल ३१ टोल नाक्यांवरून देखील राजकारण तापण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त प्रवास करणाऱ्या वाहन धारकांना या महामार्गावरून प्रवास करत असताना तब्बल १८०० ते २००० रुपयांचा भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे या सर्व विषयांवरून वादाला आणखीनच तोंड फुटण्याची शक्यता आहे.

आरटीआय कार्यकर्ते आणि टोल अभ्यासक संजय शिरोडकर यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हि माहिती मिळवली आहे. मुंबई ते नागपूर असा जवळपास ७०० किलोमीटरचा समृद्धी महामार्ग आहे. गेल्या काही महिन्यांपासून जमीन अधिग्रहणाच्या वादावरून समृद्धी महामार्ग चर्चेत आहे. पाच भागांमध्ये हा ७०० किलोमीटरचा महामार्ग तयार होणार आहे.

You might also like
Comments
Loading...