सिगारेट खिशाला अपायकारक

वेबटीम : तुम्ही कालपर्यंत धूम्रपान आरोग्यास अपायकारक आहे असं ऐकलं असेल मात्र आता मंगळवारपासून ते तुमच्या खिशालाही अपायकारक ठरणार आहे. कारण सरकारने सिगारेटवर तब्बल ३१ टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
 जीएसटी कौन्सिलची १९वी बैठक नुकतीच दिल्लीत पार पडली. या बैठकीच्या अजेंड्यावर केवळ सिगारेट हा एकच विषय होता. सिगारेटवर २८ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय केंद्राने यापूर्वी जाहीर केला होता पण या बैठकीत ३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली. जीएसटी लागू झालेल्या वस्तूंच्या यादीत सिगारेट ही एकमेव सर्वाधिक जीएसटी असलेली वस्तू आहे. मिळालेल्या यादीनुसार १५९१ रुपयांच्या नॉनफिल्टर १ हजार सिगारेटस्ना आता दोन हजार ७६ रुपये मोजावे लागणार आहेत तर फिल्टर सिगारेटसाठी दोन हजार ७४७ रुपये मोजावे लागतील. या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीत पाच हजार कोटी रुपये जमा होती असे सांगण्यात आले.