परभणी : परभणी जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचे नवे रुग्ण वाढण्याची संख्या वाढली आहे. शनिवारी ३१ नव्या कोरोनाबाधिक रुग्णांची नोंद झाली आहे, तर एकाच उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ८ हजार २४७ झाली आहे. यापैकी ७ हजार ७४९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, त्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे ३२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात १७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाचे प्रतिबंधात्मक उपाययोजना आणखी कडक केल्या आहेत. जिल्हा प्रशासनाला शनिवारी १७१ अहवाल प्राप्त झाले त्यामध्ये आरटीपीसीआरच्या ११० अहवालांमध्ये २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर रॅपिड टेस्टच्या ६१ अहवालांमध्ये ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
जिल्ह्यात शाळा, आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी पाचवी ते नववीपर्यंतच्या शाळा आणि आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील आठवडी बाजार १५ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वे करवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठवाड्यात कोरोनाचा उद्रेक; जालन्यात संपूर्ण गाव सील; परभणीत आठवडी बाजार बंद
- जालनेकरांनो काळजी घ्या! जिल्ह्यात कोरोना वाढतोय; शनिवारी तिघांचा बळी; ७० नवे रुग्ण
- दीक्षाभूमी एक्स्प्रेसने मार्ग बदलला; जालना-औरंगाबादेतील उत्तर भारतीय नागरिकांची गैरसोय
- इंतजार खतम : अखेर भारतीय संघात ‘सूर्य’ तळपणार ; सुर्यकुमार यादवची टी20 संघात निवड
- ‘तेंव्हा जर तुम्ही आमच्याशी ‘लव्ह मॅरेज’ केले असते, तर आज राज्यात युतीचीच सत्ता राहिली असती’