फिलीपीन्स : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने रौद्ररुप धारण केले आहे. देशात दररोज १ लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा होत आहे. वाढत्या कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी सरकारडून कडक निबंध देखील लागू केलेले आहेत. देशभरात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील काही दिवसांपासून देशभरात मिनी लॉकडाऊन आणि वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
लोकांकडून कोरोनाच्या नियमाचे पालन केलं जाव यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. यानिमित्तानं पुन्हा एकदा लोकांना २०२० च्या वेळी रस्त्यावर जे चित्र दिसलं होतं, त्याची आठवण झाली आहे. फिलीपीन्समधून अशीच एक धक्कादायक घटना समेर आली आहे. एका व्यक्तीनं कोरोना निर्बंध तोडल्यामुळे पोलिसांनी या माणसाला दंड बैठका मारण्याची शिक्षा दिली. ३०० दंड बैठका मारल्यानंतर या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे.
ही घटना १ एप्रिल रोजी घडली. मेट्रो न्यूजनं दिलेल्या माहितीनुसार या माणसाचं नाव डॅरेन पेनारेडोंदो असून वय २८ वर्ष होतं. घरातलं पाणी संपल्यामुळे नाईलाजानं हा माणूस रस्त्यावर उतरला होता. त्याचवेळी स्थानिक पोलिसांनी त्याला रस्त्यावर अडवलं आणि शिक्षा म्हणून दंड बैठका काढायला लावल्या. सुरूवातीला पोलिसांनी १०० दंड बैठका मारायला लावल्या. लगेचच या माणसानं ही शिक्षा पूर्ण केली. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा शिक्षा वाढवत या तरूणाला ३०० बैठका मारायला लावल्या. ही शिक्षा पूर्ण केल्यानंतर पोलिसांनी त्याला सोडून दिलं. पण जेव्हा ही व्यक्ती घरी पोहोचली तेव्हा अवस्था खूपच खराब होती. अंगात त्राण नसल्यानं त्यानं जागीच आपले प्राण सोडले. या माणसाला एक लहान मुलगा सुद्धा आहे. या सर्व घटनेमुळे सर्वसामन्य नागरिकांकडून सध्या संताप व्यक्त केला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- रेस्टॉरंट, हॉटेलचे लॉकडाऊन रद्द करा! एचआरडब्ल्यूआयची मागणी
- आरटीओ कार्यालयात ‘या’ कालावधीपर्यंत सामान्यांसाठी प्रवेशबंदी
- चिंताजनक! महापालिकेतील ‘पॉझिटिव्हीटी’ वाढली
- शिवना नदी पात्रात वाळू माफीया व गावकऱ्यांमध्ये ‘सिनेस्टाईल’ हाणामारी
- सुप्रिया ताई…. पाहिलंत का…? अकेला देवेंद्र क्या क्या कर सकता है?