fbpx

काँग्रेसचे 30 टक्के उमेदवार हे सनातनशी संबंधित; आंबेडकरांचा गंभीर आरोप

टीम महाराष्ट्र देशा- रत्नागिरी सिंधुदुर्गा मदतारसंघातील काँग्रेस उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांचा सनातनशी संबंध असल्याचे आरोप झाल्यानंतर मोठे वादळ निर्माण झाले होते. प्रकरण एवढे वाढले होते कि बांदिवडेकर यांचा पत्ता कट होतोय कि काय अशी अवस्था झाली होती. आता याच मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि कॉंग्रेसवर शरसंधान केलं आहे

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी प्रचाराला सुरुवात केली. यावेळी बोलताना आंबेडकर य़ांनी काँग्रेसचे 30 टक्के उमेदवार हे सनातनशी संबंधित असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचेही नाव प्रकाश आंबेडकर यांनी घेतले.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली असून कॉंग्रेसचा पुरोगामित्वाचा बुरखा फाटला असल्याची टीका होऊ लागली आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील आवाज उठवला होता. आव्हाडांनी व्यक्तिगत रित्या या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे.