आष्टी-पाटोदा-शिरूर नगरपंचायतीसाठी तीस कोटींचा निधी

-suresh-dhas-

आष्टी :माजी मंत्री सुरेश धस यांच्या मागणीला दाद देत तसेच ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळे आष्टी, पाटोदा, शिरुर या नगरपंचायतीसाठी तब्बल तीस कोटी रूपयांच्या विकासकामाचा निधी मंजूर केला आहे.

या तीस कोटीच्या कामाचे अंदाजपत्र सादर करण्याचे पत्र सरकारकडून माजी मंत्री सुरेश धस यांना प्राप्त झाले आहे. या निधीमुळे आष्टी, पाटोदा, शिरूर या नगरपंचायत हद्दीतील विकासकामे मार्गी लागणार आहेत. या तिन्ही नगरपंचायती माजी मंत्री सुरेश धस यांच्या ताब्यात आहेत. वर्गवारीनुसार आष्टी साठी बारा कोटी, पाटोदा नगरपंचायतसाठी दहा कोटी तर शिरूर साठी आठ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.Loading…
Loading...