मुंबई : अंधेरी पोटनिवडणुका तोंडावर असतानाच निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) पक्षाचा धनुष्यबाण चिन्ह गोठवला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अशातच निवडणूक आयोगाने (निवडणूक आयोग) नवीन नाव आणि चिन्ह नोंदवण्यासाठी एक दिवसाचा वेळ दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि ठाकरेंनी आज दुपारी बैठकी घेतल्या. यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांची चिन्ह आणि नावं जाहीर केले आहेत.
उद्धव ठाकरे यांनी नोंदवली ३ चिन्हं अन् ३ नावं –
उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूल ही तीन चिन्हं उद्धव ठाकरे यांच्याकडून ठरवण्यात आली आहे. तसेच, शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे, ही नावं देण्यात आली आहे.याबाबतची माहिती अरविंद सावंत यांनी दिली आहे.
नोटाबंदीनंतर पंतप्रधान मोदी हे घासलेलं, संपलेलं नाणं आहे –
नोटाबंदीनंतर पंतप्रधान मोदी (Narendra Modi) हे घासलेलं, संपलेलं नाणं आहे. आपल्याकडे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखं खणखणीत नाणं आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो शेअर करत, ‘जिंकून दाखवणारच’, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांनी हा फोटो आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे.
सोमवारी, 10 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजेपर्यंत नाव आणि चिन्हांचे तीन पर्याय आयोगाकडे सादर करण्याचा आदेश आयोगाकडून देण्यात आला आहे. शिवसेना पक्षाचे नेते मिलिंद नर्वेकर यांनी एक फोटो शेअर करत ठाकरे गटाचे चिन्ह काय असणार आहे, याची माहिती दिली आहे.मिलिंद नार्वेकर यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये वाघ असून त्या वाघाच्या मागे जाळ असल्याचं दिसून येतं आहे. एवढंच नाहीतर त्यावर फोटोवर आमचे चिन्ह श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे असंही लिहिलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ambadas Danve | “खोकेवाल्यांच्या सेनेने शिंदेच्या नावावर सामोरं यावं, मग….”; अंबादास दानवेंचं शिंदे गटाला चॅलेंज
- Tripling Season 3 | TVF च्या Tripling सिजन 3 चा ट्रेलर रिलीज
- Vijay Shivtare | “शरद पवारांना २०१४ पासून शिवसेना संपवायची होती…”, विजय शिवतारेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग
- Apple iPhone 14 Plus | Apple iPhone 14 Plus वर सुरू आहेत बंपर एक्सचेंज ऑफर
- Supriya Sule | “हम बेवफा तो हर गीज नही थे, पर…”, सुप्रिया सुळेंचा एकनाथ शिंदेंना टोला