मनपाच्या मालमत्ता विभागाने एका दिवसात वसूल केला ६ लाखांवर कर तर ३ मालमत्ता सील

औरंगाबाद : शहरातील महानगरपालिका हद्दीतील थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली बाबत प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी स्पेशल मालमत्ता कर वसुली टास्क फोर्सची स्थापना केली आहे. शनिवारी (दि.२३) स्पेशल मालमत्ता कर वसुली टास्क फोर्स प्रमुख अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध ठिकाणी टास्क फोर्सच्या वतीने कारवाई करण्यात आली.

यात झोन ३ मधील हॉटेल मुघल दरबार यांनी त्यांच्याकडील थकीत ६० हजार मालमत्ता कर धनादेशद्वारे पथकाकडे सुपूर्द केला. तसेच पथक क्रमांक ३ यांनी कटकट गेट, नेहरू नगर येथील मतीन शेख, खलिल शेख यांच्या कडील थकीत ३० हजार धनादेशद्वारे व शेख सलीम शेख चांद यांचे १८ हजार रोख स्वरूपात वसूल करण्यात आले. गोपाल टी, उस्मानपुरा येथील इंद्रवर्धन शहा यांचा व्यवसायिक मालमत्ता कर व पाणीपट्टी ९० हजार रुपये धनादेशद्वारे वसूल करण्यात आला.

झोन ७ मधील उल्कानगरी येथील तोडकर यांच्या कडील थकीत मालमत्ता व नळ पट्टी रु १ लाख ८० हजार वसुली बाबत नळ कनेक्शन कट करण्यात आले. व सेंट लॉरेन्स प्रशालेकडून ११७६६२६ रुपये, सुरज प्रिंटर्स, टाऊन सेंटर यांच्याकडून ७० हजार, संतोष कडतारे टाऊन सेंटर यांच्याकडून १०,५३८८ व शेख मुनिर यांच्याकडून ९० हजार रुपये थकीत मालमत्ताकर पोटी धनादेशद्वारे वसूल करण्यात आले. तसेच झोन ३ मधील आझम कॉलनी येथील अफसर बेगम अब्दुल मजीद यांचे कडील थकीत व्यवसायिक व रहिवासी मालमत्ता कर १,२७,७०३ रुपये बाबत पॅथॉलॉजी लॅब सील करण्यात आली. तसेच वार्ड क्रमांक २ मधील पथकाने अदालत रोड येथील ओरिअनटल इन्शुरन्स कंपनीचे थकीत २ लाख ८२ हजार रुपयांसाठी कार्यालय सील करण्यात आले. तसेच पैठण गेट येथील दयानंद भूमिया सिंह यांच्या कडील थकीत ११,५५,८१३ बाबत मालमत्ता सील करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या