नागपूरमध्ये दुर्दैवी घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून ३ जणांचा मृत्यू

टीम महाराष्ट्र देशा : उपराजधानी नागपूरमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यात कन्हान येथील वेकोली परिसरातील मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून तीन मजुरांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी वेकोली कोळसा खाण येथे घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी मातीच्या ढिगाऱ्यावर मजूर बसले होते. मात्र, सतत पडणाऱ्या पावसामुळे जमीन भुसभुशीत झाली आहे. त्यामुळे जमीन खचून ढिगाऱ्यावर बसलेले मजूर ढिगाऱ्याखाली दबले गेले. या दुर्घटनेत तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यात सततच्या पावसामुळे सरंक्षक भिंत कोसालून दुर्घटना घडली होती. तसेच राज्यात इतरही ठिकाणी सततच्या पावसाने मोठे नुकसान झालेले आहे.