Share

Thackeray vs Shinde | शिंदे गटाकडून पक्षाच्या नावासाठी ३ पर्याय, ठाकरे गटाच्या चिन्हावर देखील केला दावा

मुंबई : निवडणूक आयोगाने शनिवारी (८ ऑक्टोबर) शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवले होते. तसचे पक्षाचे नाव देखील गोठवले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राज्यात राजकारण तापलं आहे. तर उद्धव ठाकरे हायकोर्टात गेले आहेत. दरम्यान शिंदे गटाने पक्षाच्या नावासाठी तीन पर्याय सुचवले आहे. शिंदे गट ठाकरे गटाच्या पावलावर पाऊल ठेवत आहेत. ठाकरे गटाने सुचवलेले पक्ष चिन्ह देखील शिंदे गटाने दावा केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटात रोष व्यक्त करण्यात येत आहे.

शिंदे गटाने तीन पर्याय सुचवले आहे. शिंदे गटाने सुचवलेल्या तिन्ही पर्यायामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आहे. पहीला पर्यामध्ये १) शिवसेना बाळासाहेब ठाकरे, २) बाळासाहेबांची शिवसेना, ३) शिवसेना बाळासाहेबांची असे तीन पर्याय शिंदे गटाने दिले आहेत. शिंदे गटाने ठाकरे गटाच्याच चिन्हावर देखील दावा केला आहे. शिंदे गटाच्या तीन पर्यायांमध्ये त्रिशूळ आणि उगवता सूर्य आहे. हे चिन्ह आधिचं उद्धव ठाकरे यांनी सुचवले होते. दोन्ही गटाचा सारख्या चिन्हांवर दावा झाल्यास ते चिन्ह कुणालाच मिळत नाही.

शिवेनेकडून उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूळ असे तीन चिन्ह पक्षासाठी सादर करण्यात आले होते. मात्र, हे तिन्ही पर्याय निवडणूक आयोगाच्या यादीत नसल्याचं समोर आलं आहे. फ्रीज, सफरचंद, पेन ड्राईव्ह, डस्ट बिन यासारख्या १९७ मुक्त चिन्हांपैकी एकाची निवड ठाकरेंना करावी लागणार आहे. त्यामुळे यावरुन सुद्धा वाद रंगणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

४० डोक्याच्या रावणाने प्रभू श्रीरामाचे धनुष्यबाण गोठवले-

उद्धव ठाकरे म्हणाले, मिंधे गटाचा भाजप पुरेपुर वापर करत आहे. त्या ४० जणांचा वापर झाला की फेकून देतील. निष्ठा ही विकत घेता येत नसते, हे परवाच्या मेळाव्यात दिसलं. भाजप शिंदे गटाचा हेतू शिवसेना संपवण्याचा आहे. काँग्रेसनेही शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला नाही. तुमची बुद्धी गोठली नसेल तर, बाळासाहेबांचं नाव वापरु नका.

“निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर मला नक्कीच राग आलाय आहे. पण त्यासोबतच दु:खही होत आहे. या उलट्या काळजाच्या माणसांनी त्यांच्या राजकीय आईच्या काळजात कट्यार घुसवली. ४० डोक्याच्या रावणाने प्रभू श्रीरामाचे धनुष्यबाण गोठवले. या लोकांच्या मागे असलेल्या महाशक्तीला या गोष्टींमुळे नक्कीच उकळ्या फुटत असतील. मराठी माणसाची भक्कम एकजूट तुम्ही फोडायला निघाला आहात. तुम्हाला शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे पाहिजेत, पण त्यांचा मुलगा नको. असो.. काहीही असले तरीही मी कुठेही डगमगललो नाही, आत्मविश्वास मला माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी शिकवलाय”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : निवडणूक आयोगाने शनिवारी (८ ऑक्टोबर) शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवले होते. तसचे पक्षाचे नाव देखील गोठवले आहे. निवडणूक …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics