fbpx

गणपती विसर्जनाला गेलेल्या तिघांचा जुन्नर तालुक्यातील कावळ पिंपरी येथे पाण्यात बुडून मृत्यू

जून्नर : गणेश विसर्जनाच्या दिवशीच कावळ पिपंरी गावावर शोककळा पसरली आहे. जुन्नर तालुक्यातील कावळ पिंपरी येथे तळ्यात गणपती विसर्जन करायला गेलेली ५ मुले बुडाली होती, त्यांना तात्काल पाण्यातुन काढुन रुग्णालयात दाखल केले असता त्यातील ३ जणांना मृत घोषित करण्यात आले.

आज सायंकाळी गणपती बु़डवण्यासाठी तळ्यात गेलेली पाच मुले तळ्याच्या पाण्यात उतरली होती पाण्याचा अदांज न आल्याने हे पाचजण बुडाले होते. त्यांना तात्काल पाण्यातुन काढुन रुग्णालयात दाखल केले असता गणेश नारायण चक्कर ( वय-९ वर्षे),सुमित सावकार पाबळे ( वय-११ वर्षे ),वैभव विलास पाबळे ( वय- ११ वर्षे ) यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले आहे. .आज सायंकाळी ७ च्या सुमारास ही दुर्घटना घडली.कावळ पिंपरी गावावर या दुर्घटनेमुळे शोककळा पसरली आहे